तुमची मुले 18 वर्षा खालील आहेत आणि वाहन चालवतात तर हे नक्की वाचा !
तुमची मुले जर 18 वर्षा खालील असतील आणि वाहन चालवत असतील तर वाहतूक पोलिसांच्या नियमांप्रमाणे तुम्हाला दंड किवा तुरुंगवास होऊ शकतो. हो हे खर आहे हा नियम 2019 मध्ये बनवण्यात आला आहे. अल्पवयीन मुलांमुळे होणार्या अपघातांचे दिवसेंदिवस प्रमाण वाढत आहे त्यामुळे वाहतूक पोलिसांना कडक नियम करणे बंधनकारक झाले आहे. या जुन्या नियमांची नव्यानं कठोरपणे अमलबजावणी केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या परिपत्रकानुसार 18 वर्षाखालील व्यक्ति जर वाहन चालवताना आढळली तर त्याच्या पालकांना 25,000 हजार दंड किंवा तुंगवासाची तरतूद केली गेली आहे.
काय आहे नियम
18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांनी वाहन चालवल्यास 25 हजार दंड. वाहन चालक, मालक अथवा पालक यांना 3 वर्षापर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा. दंडात्मक कारवाई झाल्यास वयाच्या 25 वर्षापर्यंत परवाना मिळणार नाही किंवा 1 वर्षापर्यंत वाहन नोंदणी रद्द होऊ शकते, त्यामुळे रस्त्यावर वाहन चालवता येणार नाही. अल्पवयीन मुले रस्त्यावर बेदरकारपणे वाहने चालवून स्वःतचा आणि दुसर्यांचा जीव धोक्यात घालतात. यामुळे या नियमांची कठोरपणे अमलबजावणी करण्यात येणार आहे.
वाहतूक नियमांनुसार, मोटर वाहन चालवण्याचा वैध ड्रायविंग लायसन्स साठी अर्ज करण्याचे किमान वय हे 18 वर्ष आहे. या नियमांचे सर्रास उल्लंघन करून वाहन चालविली जातात. जर अल्पवयीन मुलांचा अपघात झाला तर त्यांना विमा ही मिळत नाही.
अल्पवयीन मुलांची वाहन चालवण्याची टक्केवारी ही 5-7 टक्के आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. म्हणून महाराष्ट्र वाहतूक विभागणे चालवणार्या पेक्षा त्याच्या पालकांसाठी कडक नियम बनवले आहेत. यानुसार पालकांना 25000 हजार रुपये दंड आणि 3 वर्षांचा कारावास होऊ शकतो.
No comments:
Post a Comment